कॉलेजमध्ये असतानाही अशीच गोड हसायची. खरंतर कॉलेजच्या पहिल्या दिवशी स्टेशनबाहेर बसची वाट बघत उभी होती, तेव्हा आपल्याच वर्गात असेल, असं वाटलंच नव्हतं. पुढे मग चार वर्षं कशी भुर्रकन उडून गेली, कळलंच नाही. वयही तसंच होतं म्हणा; पण ते हसणं सकाळ-संध्याकाळ, खातापिता, उठताबसता सतत आपल्या आसपास वावरत राहील अशी अपेक्षा म्हणा, इच्छा म्हणा, काहीही - गैर वाटलंच नाही. आणि कदाचित त्यामुळेच, अपेक्षाभंगाचं दु:ख आजही सलतं.
एक तपापेक्षा जास्त काळ लोटलाय. पण तिचा पोटावर Best Christmas gift ever असं लिहिलेला हिरवा स्वेटर घालून Christmas Tree समोर उभी असलेला फोटो आज ध्यानीमनी नसताना बघण्यात आला, आणि ओठांवर हसू फुटलंच!
*********************************************************************************
: बोर होतंय
: नेटफ्लिक्स? लॉस्ट?
: चालेल. आणि वाईन पण घेऊन बस.
: परत?
: घे ना
: बरं
: ब्लॅन्केट हवंय
: थंडी नाहीये
: तर काय झालं?!
: आणि थंडी असली तरी फुल स्पीडवर फॅन लावून ब्लॅन्केटमध्ये गुरफटून घेतेस
(हसण्याचा खळखळाट)
: मला सॉयर आवडतो. कसला हॉट आहे नं?!
: जॅक भारी आहे पण. विचार करुन वागतो. आणि he is calm..and..काय गं, काय झालं एकदम?
: goosebumps!
: काय करतेयस?!
: आणि तू करतोयस ते?! तेच!
: तुला काय वाटलं ब्लॅन्केटमध्ये गुरफटून घ्यायला तुला एकटीलाच आवडतं?!
(लाजून हासणे अन हासून ते पहाणे)
: गार झालंय नं?!
: ते बघ!
: काय?
: चंद्र! आठवलं मी पुण्यात असताना काय सांगितलं होतं?
(असंख्य हसऱ्या चांदण्या)
गेली काही वर्षं full moon, supermoon, blood moon नेमाने आले. Although, हसऱ्या चांदण्या seem lost. So does my Kate! पण पुण्यात असल्यापासून ज्याची आतुरतेने वाट बघितली होती, त्या चंद्राने आज हसवलंच!

Weekdaysमध्ये लॉंग रनसाठी वेळ मिळतच नाही. म्हटलं आज २-३ मैलच करू. Alder drive वर VTAचा बसस्टॉप आहे. आणि एक लाकडी बाकडं. तिकडे कधीच कुणीच नसतं; तरी तो स्टॉप का लावून ठेवलाय कळत नाही. Tasmanवरून Alderवर वळलो,तर समोर बाबा! मी दिलेला NC Stateचा स्वेटशर्ट आणि ती त्यांची ब्राऊन पॅंट. म्हणजे आत तो लायनींचा ऑफ-व्हाईट, क्रीम कलरचा शर्ट पण असणारच! म्हटलं, बाबा इकडे कुठे?! तर म्हणतात, माझा नेहमीचाच route आहे walkingचा. मला वाटलं फेकतायत! मी किती वेळा पळालोय त्या routeवर पण कधीच दिसले नाहीयेत. त्याबद्दल त्यांना confront करण्याआधीच डोळे उघडले!
न धावताही घामेजलो होतो.
२०११ मध्ये इकडे आले होते, तेव्हा सोलकढी भात आणि पापलेट फ्रायचा बेत केला होता एरंडे family dinnerला येणार म्हणून. नवीनच घेतलेल्या DSLRमधले सुरुवातीचे काही फोटो. सुईत दोरा ओवताना आपण extra carefully ते काम करत असतो; पण आसपास काय चाललंय, कोण काय बोलतंय याचं भान असतंच. तशातच कोणी असं काहीतरी बोलावं, ज्यामुळे नकळत चेहऱ्यावर हसू फुटावं, अशा अवस्थेतला बाबांचा फोटो. अर्थात ते काही सुईत दोराबिरा ओवत नव्हतेच; निखिलची सारा अगदी साभिनय old McDonald had a farm सादर करत होती, ते बघत होते गुंग होऊन,कौतुकमिश्रित हसून! अमर आणि ते एकमेकांची खेचायचे, आणि दोघे मिळून माझी खेचायचे, तेव्हा मात्र खळखळून हसायचे. ते त्यांचं एकच, खळखळणारं हसू आजपर्यंत ओळखीचं होतं माझ्या.
फोटोतलं जास्त स्पेशल आहे पण! फोटो बघताना ते हसणं माझ्याही चेहऱ्यावर आपोआप येतं म्हणून!

कित्येकदा मीच लिहिलेला एक शेर सतत आठवत राहतो -
आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा
(विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी)
दररोजच्या रामरगाड्यातल्या पेपरकट्स सारख्या आठवणी आणि त्यातलं हे हसणं. या पेपरकट्सचे दंश भरून येत नाहीत, त्यांची दुखणी होतात.